Home-- Regional Language Online Conference --Marathi Online Conference: 10-12 June 2020 - FAQ

सृजनशील शिक्षण ऑनलाईन परिषद १०-१२ जून २०२०

सातत्याने विचारले जाणारे प्रश्नावली

ऑनलाईन परिषद १०-१२ जून २०२०

परिषदेचा मुख्य विषय काय आहे?


या परिषदेच्या निमित्ताने शिक्षणाकडे बघण्याची वेगळी दृष्टी आपल्याला तयार करता येईल का? नक्की कुठले पैलू महत्त्वाचे ठरणार आहेत? पालकांची भूमिका कशी बदलणार आहे ? शिक्षकांची भूमिका कशी बदलणार आहे ? आपण पूर्वी या अनुषंगाने काही प्रयोग केले आहेत का? प्रकल्प-पद्धती, ज्ञानरचनावाद यासारख्या विविध पद्धतींचा या सगळ्या परिस्थितीत कसा वापर करून घेता येईल? कोरोनासारख्या संकटांमुळे होम स्कुलिंगचा विस्तार अधिक होईल का? संगणक, विविध वेबसाईट, आंतरजाल, भ्रमणध्वनी (मोबाईल) या साधनांची या काळात होत असलेली मदत, त्याची समाजातील सर्व स्तरांमध्ये असलेली उपलब्धता किंवा अनुपलब्धता आणि त्याचा मुलांच्या शिक्षणावर होणार परिणाम यांसारखे अनेक पैलू या परिषदेच्या मंचावर मांडले जावे. आपले या बाबतीतले सर्व विचार आमच्यासाठी आणि शिक्षणक्षेत्रासाठी महत्त्वाचे आहेत.
परिषदेचे स्वरूप कसे असेल?


प्रत्यक्ष भेट न होता आपले विडिओ (पूर्व ध्वनिमुद्रित) २६ मे ते १० जून २०२० या काळात सीसीईच्या फेसबुक तसेच युट्युब चॅनेलवर (#CCEFINLAND) प्रक्षेपित केले जातील. याकरिता आपला शोध निबंध, पूर्व ध्वनिमुद्रण आणि फोटो दिनांक २५ मे २०२० पर्यंत आमच्याकडे पोहोचणे अपेक्षित आहे. परिषदेचे वेळापत्रक ५ जून २०२० पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होईल . आपल्याला आपला अंतिम व्हिडिओ २५ मे २०२० पूर्वी पेपर प्रेझेंटेशन स्लाइडसह पाठविणे आवश्यक आहे. पेपर प्रेझेंटेशन ६ मिनिटांपेक्षा जास्त व्हिडिओ (एमपी 4 फाइल स्वरूप) नसावे. कृपया लक्षात घ्या की आपण पाठविलेल्या पूर्व-रेकॉर्ड केलेला व्हिडिओचे अंतिम सादरीकरण होईल. आपल्याला तिन्हीपैकी कोणत्याही एका दिवशी (१०/११/१२ जून २०२०) संमेलनात सामील होण्यासाठी दुवा (LINK) मिळेल. थेट सत्रादरम्यान, आपल्याला कमीतकमी १ तास ३० मिनिटांसाठी उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह ऑनलाइन उपस्थित असणे आवश्यक आहे.
१०-११-१२ तारखेचे वेळापत्रक कसे असणार आहे?


परिषदेचे वेळापत्रक ५ जून पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
शोध निबंध मराठी / इंग्रजी भाषेतच असणे आवश्यक आहे काय?


कोणत्याही एकाच भाषेत असणे बंधनकारक नाही. मराठी/हिंदी/इंग्रजी लवचिकतेने (flexible) भाषेचा वापर करू शकता.
शोध निबंधाला शब्द मर्यादा किती?


२५०० जास्तीत जास्त असावा आणि तो मायक्रोसॉफ्ट वर्ड स्वरूपात पाठविणे अपेक्षित आहे.
शोध निबंधक प्रत्यक्ष संवाद करू शकणार काय?


होय
परिषदेचा उद्देश काय आहे?


सध्या जग एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहे. शिक्षणक्षेत्रातही त्यामुळे अभूतपूर्व बदल झालेले आपण बघत आहोत. या बदलांसाठी आपण खरंच तयार होतो का? आपल्या शिक्षण पद्धतीने आपल्या शिक्षकांना, पालकांना आणि मुलांना यासाठी तयार केलं होतं का? हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने आपल्या समोर उभे ठाकले आहेत. आगामी काळातले शिक्षण नक्कीच बदलावे लागेल. अर्थातच त्याचा परिणाम शिक्षक आणि पालक या दोन्हीही घटकांवर होणार आहे. या बदलाचं स्वरूप कसं असेल? कुठले बदल घडायला हवे ? का? आणि कसे? कुठे आणि केंव्हा? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी आपण सगळे ऑनलाईन भेटू या.
प्रत्येक शोध निबंध सादरीकरणाचा कालावधी किती असणार आहे?


६-८ मिनिटे पूर्व ध्वनिमुद्रण अपेक्षित आहे.
ध्वनिमुद्रण (Video) किती तारखेपर्यंत पाठवणे अपेक्षित आहे?


उशिरात उशिरा २५ मे २०२० पर्यंत आमच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे (त्यानंतर पाठविल्या जाणाऱ्या शोध निबंधाचा स्वीकार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी).
एकच शोधनिबंध दोन व्यक्तींना एकाच वेळेला सादर करता येणार आहे काय?


होय, परंतु नावनोंदणी आणि प्रत्येक शोध निबंधकाचे शुल्क वेगवेगळे भरणे अपेक्षित आहे.
प्रशस्तिपत्र कसे प्राप्त करता येईल?


मराठी परिषदेअंतर्गत प्रथमच सिसिई आणि बॅजक्राफ्ट (https://www.badgecraft.eu/) संलग्न ब्लॉक चेन सर्टिफिकेट/प्रशस्तिपत्र प्राप्त करता येणार आहे. याकरिता प्रत्येक व्यक्तीने सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित आहे. ३१ मे २०२० पर्यंत कॉन्फरन्स बद्दल ब्लॉग किंवा पोस्ट लिहून (300 शब्दांत) हे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर, लिंकेडिन, व्हॉट्सअप, इत्यादी.) सामायिक करुन हा बॅज मिळविला जाऊ शकतो. कृपया पोस्टमध्ये पुढील हॅशटॅग वापरल्याची खात्री करा. #CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना. ब्लॉग किंवा पोस्ट सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० याची नोंद घ्यावी.
‘केवळ प्रेक्षक’ प्रशस्तिपत्र प्राप्त करता येणार आहे काय?


नाही, या करिता आपल्याला सक्रिय सहभागी होणे अपेक्षित आहे. ३१ मे २०२० पर्यंत कॉन्फरन्स बद्दल ब्लॉग किंवा पोस्ट लिहून (300 शब्दांत) हे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर, लिंकेडिन, व्हॉट्सअप, इत्यादी.) सामायिक करुन हा बॅज मिळविला जाऊ शकतो. कृपया पोस्टमध्ये पुढील हॅशटॅग वापरल्याची खात्री करा. #CCEFinland #Covid19 #CreativeLockdown #GoCorona #गोकोरोना. ब्लॉग किंवा पोस्ट सादर करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० याची नोंद घ्यावी.
प्रशस्तिपत्र केव्हा प्राप्त करता येईल?


परिषद सांगता झाल्यानंतर दिनांक २५ जून २०२० पर्यंत आपण स्वतः प्रशस्तिपत्र प्राप्त करू शकणार आहात, त्यानंतर कोणत्याही कारणास्तव प्रशस्तिपत्र मिळवता येणार नाही.
अनुपस्थित शोध निबंधक/सादरकर्त्याचे शुल्क परत मिळेल काय?


नाही, कोणत्याही कारणास्तव आपण अनुपस्थित राहिल्यास शुल्क परत मिळू शकणार नाही, याची नोंद घ्यावी. कारण आपल्या पाठविलेल्या शोध निबंधाचे तसेच पूर्व ध्वनिमुद्रणाचे नियोजन आणि व्यवस्थापन करणे क्रमप्राप्त आहे.

सीसीई चे विविध अभ्यासक्रम / CCE's  various courses 

Bank Details

PayTm Code

1/5
  • YouTube
  • Wix Facebook page
  • Instagram
  • Wix Twitter page
  • Pinterest
  • LinkedIn

© CCE FINLAND OY