top of page

शिक्षणतंत्र - पुस्तक प्रकाशन

sameerganpule


सप्रेम नमस्कार


Council for creative education या आमच्या संस्थेविषयी आपण जाणता. शिक्षण क्षेत्रात सृजनशील शिक्षण आणि फिनलंड शिक्षण पद्धतीच्या संयोगाने योग्य आणि उपयुक्त बदल घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही फिनलंडची शिक्षण पद्धती आणि भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी पुस्तक लिहिले आहे. आमचे दोघांचे फिनलंड आणि भारतातील शिक्षण पद्धतीतले अनुभव आणि अभ्यास या पुस्तकात मांडला आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक 5 जून रोजी सायंकाळी 4:30 ते 6:30 , संत ज्ञानेश्वर सभागृह, MIT WPU कॉलेज, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री. अविनाश धर्माधिकारी (माजी सनदी अधिकारी) सर आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय डॉ. श्री. विश्वनाथ कराड सर आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्री. वसंत काळपांडे सर (माजी शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य) आहेत.

या प्रसंगी आपली सन्माननीय उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या येण्यामुळे या समारंभाची शोभा अनेक पटींनी वाढणार आहे त्यामुळे अवश्य येण्याचे करावे.

https://www.youtube.com/watch?v=P9BbW2kM-ZM


प्रकाशनपूर्व नावनोंदणी करून आपण खास सवलतीचे मूल्य देऊन आपली प्रत आजच नोंद (बुक) करू शकता. पुस्तक नावनोंदणी: https://forms.gle/6SYcdrKPw8Pa1wNZ7 आपण पुस्तकाचे मूल्य रु.२००/- QR CODE अथवा Gpay अथवा payTM द्वारे +919890436368 या क्रमांकावर करू शकता.

आपली प्रत ५ जून २०२२ रोजी प्रकाशन समारंभ संपन्न झाल्यावर कार्यक्रम स्थळी मिळेल, अन्यथा अतिरिक्त कुरियर चार्जेस (@actual) देऊन घरपोच मिळेल.

संपर्क: +919890436368 लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा.

आपल्या प्रतीक्षेत, श्री. हेरंब कुलकर्णी. सौ. शिरीन कुलकर्णी.

संपर्क +358504839418 / 7420049704 http://www.ccefinland.org

 
 
 

Comments


bottom of page