
पहिली आंतरराष्ट्रीय सृजनशील शिक्षण परिषद
हेलसिंकी , फिनलंड - ११ - १५ मे २०२६
संकल्पना:
सृजनशील शिक्षण आणि बदलत्या शैक्षणिक गरजा
परिषदेबद्दल संक्षिप्त माहिती
“पहिली आंतरराष्ट्रीय मराठी सृजनशील शिक्षण परिषद” ही मराठी भाषेत फिनलंडसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आयोजित होणारी पहिलीच परिषद आहे.
दिनांक ११ ते १५ मे २०२६ या काळात हेलसिंकी येथे होणाऱ्या या परिषदेचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील शिक्षकांना फिनलंडच्या अभिनव शिक्षणपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव देणे, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण, राज्य अभ्यासक्रम चौकटीची अंमलबजावणी, सृजनशील वर्गखोल्या, विषयांचे एकत्रीकरण, कौशल्याधारित शिक्षण आणि नाविन्यपूर्ण मूल्यमापन पद्धती यावर विचारमंथन करणे हे आहे.
या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सत्रे संपूर्णपणे मराठीत घेण्यात येणार असून, ती “शिक्षकांनी – शिक्षकांसाठी – शिक्षकांची” या संकल्पनेतून साकारली आहेत.
मराठी भाषेला "अभिजात" भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी शिक्षकांना नवे विचार, नवा दृष्टिकोन आणि जागतिक शैक्षणिक प्रेरणा देणारा हा ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे.
प्रमुख आकर्षण :
-
संशोधन सादरीकरण आणि चर्चासत्र.
-
फिनिश तज्ञांसमवेत कार्यशाळा.
-
हेलसिंकी शहरातल्या पर्यटन स्थळांना भेट
-
फिनलंडमधील शिक्षण पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव.
शोधनिबंध / सृजनशील उपक्रम संकल्पना :
मुख्य विषय : सृजनशील शिक्षण आणि बदलत्या शैक्षणिक गरजा
-
पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शालेय शिक्षण
-
सृजनशील अध्यापन प्रशिक्षण
-
सृजनशीलतेला पोषक पालकत्व
-
सृजनशील शिक्षणामधील अनेकानेक अडथळे व ते पार करण्याचे मार्ग
-
शिक्षणाचा भविष्यवेध सृजनशीलतेच्या नजरेतून
-
तंत्रज्ञानाचे सृजनशीलतेवर होणारे परिणाम
**शोधनिबंधांचे पुस्तक करण्यासाठी किमान २० शोधनिबंध येणे अपेक्षित आहे.
यादीतील कोणत्याही विषयावर किंवा मुख्य विषयाची व्याप्ती वाढवणाऱ्या इतर कोणत्याही विषयावर तुमचा ३०० शब्दांत सारांश सादर करा.
आपला शोधनिबंध (सारांश) अथवा सातत्यपूर्ण सृजनशील उपक्रम पाठविण्याची अंतिम शेवटची तारीख १५ मार्च २०२६ आहे.
कोणत्याही तपशीलवार प्रश्नांसाठी कृपया आम्हाला info@ccefinland.org वर लिहा.
#पैसे हप्त्यांमध्ये भरण्याची सोय उपलब्ध
यात काय समाविष्ट आहे?
-
४ रात्रीची सुव्यवस्थित निवास व्यवस्था (बजेट हॉटेल/हॉस्टेल)
-
व्हिसा साठी लागणारे निमंत्रण पत्र
-
विविध शाळांना भेटी देणे
-
मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांना भेटणे
-
कार्यशाळा
-
शोधनिबंध सादर करण्याची संधी (शोधनिबंध बंधनकारक नाही.)
-
शोधनिबंधांचे पुस्तक तयार करण्यात येईल**
-
विविध पर्यटन स्थळांना भेटी
-
लोकल ट्रान्स्फर (हॉटेल ते शाळा आणि परत)
-
वेळापत्रकाप्रमाणे सकाळची न्याहारी व दुपारचे जेवण
-
शिक्षणगंगा या पुस्तकाची प्रत
-
शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा (LMS) - ऍक्सेस
-
प्रशस्तिपत्र
**शोधनिबंधांचे पुस्तक करण्यासाठी किमान २० शोधनिबंध येणे अपेक्षित आहे.
यात काय समाविष्ट नाही?
-
विमानाचे तिकीट
-
व्हिसा शुल्क, व्हिसा प्रक्रिया
-
प्रवास विमा (ट्रॅवल इन्शुरन्स)
-
रात्रीचे जेवण (स्वतःच्या सोयीनुसार)
-
समावेशांमध्ये उल्लेख नसलेली कोणतीही गोष्ट
अधिक माहितीसाठी संपर्क
आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन (१२ ऑक्टो. २०२५ पर्यंत) खास सवलत योजना
रु.५०००/-* भरून आपला सहभाग निश्चित करावा आणि सुलभ हप्त्यात उरलेली रक्कम भरण्याची संधी !
*अटी लागू
पुणे ऑफिस : +917588109540 । info@ccefinland.org
फिनलंड शैक्षणिक दौरा
कार्यक्रम वेळापत्रक
११ मे - सोमवार रोजी संध्याकाळपर्यंत फिनलंडला पोचणे
१२ मे - पहिल्या शाळेला भेट आणि हेलसिंकी पर्यटन
१३ मे - दुसऱ्या शाळेला भेट आणि प्रशिक्षण सत्र
१४ मे - कॉन्फरन्सचे उद्घाटन आणि शोधनिबंध सादरीकरण
१५ मे - प्रमाणपत्र वितरण आणि सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार वितरण
१५ मे - दुपारी १२ नंतर परतीच्या प्रवासासाठी प्रयाण
शुल्कभरणा / परिषदेचा खर्च
नियमित फी ₹ २०००००/- असून
विशेष ऑफर किंमत ₹ १४९९००/-* आहे.
विशेष योजना व अंतिम मुदत (देयक वेळापत्रक)
-
नोंदणी शुल्क: ₹ ५०००/-* (१२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत)
-
पहिला हप्ता: ₹ १०००००/-* ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत
-
दुसरा हप्ता: ₹ ४४९००/-* १५ डिसेंबर २०२५ पर्यंत
*अटी लागू
बँक तपशील
All the payments can be made in INR to CCE Finland’s India bank account.
Bank Transfer (NEFT/IMPS): ICICI Bank Ltd
Bhandarkar Road Branch, Pune
Account Name: Council for Creative Education, Finland
Account Number: 624005501050
IFSC Code: ICIC0006240
MICR: 411229006
UPI ID: 9890436368.ibz@icici
नोंद: आपण भरणा केल्यानंतर कृपया +917588109540 क्रमांकावर स्क्रिनशॉट पाठवावा.












